अत्यंत तातडीचे अर्ज :
प्रति,
प्रति,
मा. मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र शासन.
(अधिवेशन नागपुर महाराष्ट्र)
विषय : अधिवेशन मध्ये गुरुद्वारा सचखंड श्री हजुरसाहिब मंडळ (बोर्ड) कायदा संशोधन रद्द करण्या बाबत.
: नांदेडच्या जनतेत प्रचंड रोष असल्या बाबत.
मा. महोदय,
शासनाने नांदेड येथील गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुर अबचल नगर साहिब मंडळ (बोर्डच्या) कायदा १९५६ मधील कलम ६, ७ आणि १५ मध्ये संशोधन प्रस्तावित केले आहे. आणि नागपूर येथे सुरु असलेल्या विधान सभा अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यावरून नांदेडच्या शीख समाजात प्रचंड रोष व्याप्त झाला आहे. शासन अल्पसंख्यांक शीख समाजाच्या धार्मिक संस्थे मध्ये बळजबरीने कायदा संशोधन करून संस्थेचे "सरकारीकरण" करत असल्याची भावना पसरत आहे. नांदेडच्या शीख समुदायाची संस्था हे "तखत " म्हणजेच धार्मिक पीठ आहे. या पवित्र स्थळाच्या पूजापाठाची विशेष शैली आहे, ज्याला मर्यादा म्हणतात.
मुंबई आणि बाहेरचे काही काटकारस्थानी व्यक्ती या संस्थेवर आपला कब्जा करून मर्यादा बदलण्याच्या बेतात आहे. मुंबईचे आमदार यांनी अशा प्रवृत्तीचे नेतृत्व स्वीकारले आहे. आमदार तारासिंग आपली दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे कायदा संशोधनाचा विषय वारंवार मांडला जात आहे. ता. १२ मार्च, २०१५ आणि ता. २७ जून, २०१८ रोजी गुरुद्वारा कायद्यात बदल करून शासनाने एका तखत (धार्मिक स्थळावर) वर राजकारण लादला आहे शिवाय स्थानिक शिखांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचवली आहे. भाजपा शासन शीख समाज विरोधी आहे काय असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. तेव्हा शासनाने गुरुद्वारा कायदयात बदल किंवा संशोधन करू नये तर ता. १२ मार्च, २०१५ रोजी केलेला संशोधन सुद्धा रद्द करावा. हि नम्र विनंती. धन्यवाद.
आपला,
स. रवींद्र सिंघ मोदी,
(Activist and News Reporter)
रा. अबचलनगर कॉलोनी,
भगत सिंघ जी रोड,
नांदेड (महाराष्ट्र)
०९४२०६५४५७४.
----------
कृपया कळावे हि विनंती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें